माझे मन..
माझे मन..
माझे मन फक्त
तुझेच गाणे गाते..
सुर ताल आठवणींचे
मनोमनी उधळत राहते..
माझे मन तुझ्या
थकव्याचा विसावा..
तुझ्या मनाचा अल्पविरामही
पुरेसा व्हावा...
माझे मन तुझ्यासाठी
फुलांनी भरलेले मुक्तांगण..
तुझ्या चेहर्यावर पसरलेल्या
हास्याचे ते तुषारी आनंदवन
माझे मन
तुझ्या प्रेमाचा पसारा..
तुझ्या मायेचा हा एक
अजब खेळ सारा...
माझे मन कधी कधी
तुझ्या अश्रूधारांचा पाझर..
अन कधी भावनेच्या पुराला
घातलेला सहानभुतीचा आवर..
माझे मन
तुझेच घरटे..
जिथे तुला सारे सुख
स्वर्गापरी भासते..
पण तुझे मन
माझीया स्वप्नांचे माहेर..
अस्तित्वात त्यांला
तुझ्या अखंड साथिचा आहेर....