Sunday, August 26, 2007

तु येशील का?

तु येशील का?

मि निघालो आहे आता
दुनियेत चांदण्यांच्या..
तु येशिल का प्रिये
वेचण्या सडा सुवर्ण फुलांचा...

मला ओलं चिंब व्हायचय..
धरतीवरी टपोरा थेंब होऊन बरसायचय..
तु येशिल का?
जिथे तुला हि माझ्या देहवरूनी ओघळ्णारी सर व्हायचय..

मला आवडत किनार्यावर जायला
तिथल्या रेतीत तुझं नाव लिहायला..
तु येशिल का?
आपल्या प्रेमाच्या पाऊलखुणा उमटवयाला..

मला हाउस जत्रेत हिंडायची..
उंच उंच पाळ्ण्यात बसून किंचाळण्याची..
तु येशिल का?
तुला भेट म्हणून घेणार्या बांगड्यांचा रंग ठरवायला...

सवय माझी बाईकवर हुंदडत रहायची
वारा होऊन वेगाशी स्पर्धा करायची...
तु येशील का?
माझ्या मागे बसून प्रेमाच्या गुदगुल्या करायला..

सिनेमाची आवड मला..
सुट्टीच्या दिवशी संध्याकाळचा शो ठरलेला..
तु येशील का?
माझ्या सोबत बसून हिरो हिरोईन चे स्वप्न पहायला..

कातरवेळ आली दाटून की
तळ्याजवळ जायचे..
तुझ्या आठवणीच्या तरंगामधे
माझे प्रतिबिंब उदास होताना पहायचे

साजने सांग ना तु येशिल का?
तुझी आठवण असह्य झाली की
मला बिलगूनी घेशील का?
सांग ना तु येशील का? सांग ना?

" तुझं ", माझ्या स्वप्नातलं अस्तित्व..

तु अशी रोज रोज

तु अशी रोज रोज
माझ्या स्वप्नात येतेस..
माझ्या आयुष्याच्या मांडवाला..
अस्तित्वाची प्रेमळ झालर सजवतेस..

माझ्या झोपेत सारे
तुझ्या जादुचे खेळ चालती..
कधी कडे डोंगराचे तर
कधी किनारे सागराचे चालती..

मग प्रभातीला मज अखेर
कोवळी किरणे मला जागवती..
किरणाचा रोष आवरता आवरता..
मज तुच सामोरी दिसती..

दिवसाची सुरवात अनोखी..
त्यात आठवती तुझ्या हास्याचे मोती..
मन माझं हर्ष उल्हासीत..
त्यात उजाळल्या तुझ्या मंदज्योती..

दिस डोईवर आला..
उन्हाने मला उष्णज्वर आला..
अचानक तुझे मेघ दाटूनी आले..
अन तुझ्या चैतन्याचा वर्षाव झाला..

कातरवेळी तुझी आठवणीने
मला असह्य जाहले..
अस्तिवाहूनही कठोर यातनांचे घाव
मि तुझ्या दुराव्याच्या कल्पनेत सोसले..

मग आलीस तू सजूनी..
सडा चंद्रतार्याच्या लेवूनी..
मन माझे थुईथुई मयुर जाहले
अस्तित्वाचे गुज तुझ्या डोळ्यात पाहीले..

असे स्वप्ननगर माझे..
आपुली सीमा पसरवत आहे..
अस्तिवाच्या साम्राज्याला मात्र
तुझ्याच हुकुमशाहीची खरोखर गरज आहे...

Newer Posts Older Posts Home

 

blogspot templates | Webtalks