रोमरोमांत भिनलास तू......
रोमरोमांत भिनलास तू......
रोमरोमांत भिनलास तू,
माझ्यात सामावलास तू,
माझिया मनातल्या कळ्यांचा,
फूलोरा बनलास तू...
आलास जीवनी असा,
जसा वारा सोसाटयाचा,
मला उडावून नेणारे,
वादळ बनलास तू...
तुझिया मिठीत सामावूनी,
तप्त अशी मी जाहले,
माझिया मिठीत धुंदावूनी,
फक्त माझा बनलास तू...
जगतच होते मी तशीही,
दिशाहीन नावेपरी,
येवूनी जीवनात माझ्या,
किनारा बनलास तू..