Saturday, September 1, 2007

आठवणीने दे.....

आठवणीने दे.....

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे
क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवणीने दे....

बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे....

बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवणीने दे....

उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवणीने दे....

मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे
माझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र....

आठवणीने दे.....

Newer Posts Older Posts Home

 

blogspot templates | Webtalks