Thursday, August 9, 2007

जेव्हा मी तुला प्रथम पाहीले..

जेव्हा मी तुला प्रथम पाहीले..

ओंजळीत शुभ्र फुलांच्या कळ्या
वेचून तु झरझर निघालीस..

पैंजणाच्या तालावर खरोखर
तु मला वेड लावूनी गेलीस..

तलम रेशमी केस तुझे
गालावरून ओठांवर पसरले होते...

तुझ्या मखमली गालांवरून
डोक्यावरच्या पदराचे काठ सरकत होते..

डोळ्यात तुझ्या सुर्याचे प्रतिबिंब
किती सुंदर झळकत होते..

कोरीव भुवयांच्या मधोमध..
तेज दिव्य शक्तिचे तळपत होते..

तुला पाठमोरी होताना पाहूनी..
मना हूरहूर लागली....

Newer Posts Older Posts Home

 

blogspot templates | Webtalks