शाळेची आठवण...
शाळेची आठवण...
आठवतात ते दिवस,
वर्गात जाण्यासाठि धावायचो,
पहिला बॆंच पकडण्यासाठि,
अनेकदा धडपडायचो.
आठवते मला दप्तरातली,
पेन्सिल आणि दुहेरी रेघांची वही,
घ्यायला लागायची ग्रुहपाठावर,
नियमित आई बाबांची सहि.
रोज सकाळि प्रार्थनेला,
वेळेवर हजर राहणे,
मधल्या सुट्टित डबा खाऊन,
धावत मैदानावर जाणे.
हस्तकलेच्या तासाला,
काहितरी उपद्व्याप करणे,
अन वर्गासमोर शिक्षकांचा,
पाठित धपाटा खाणे.
खेळाच्या तासाला जाताना,
एका रांगेतुन चालणे,
अन परत येत असताना,
मित्रांच्या खोड्या काढणे.
सहामाहि परिक्षेनंतर येणा-या
दिवाळिच्या सुट्टिची मजा
आणि त्या सुट्टित बाईंनी दिलेल्या
दिवाळिच्या अभ्यासाची सजा.
वार्षिक परिक्षेच्या वेळि,
येणा-या उन्हाळि सुट्टिची तयारी,
अन निकाल लागल्यानंतर,
बाहेर पडायची आमची हुशारी.
परत नवीन वर्गात जाण्यासाठि,
मनं उत्साहि व्हायचं,
अन पहिला बॆंच पकडण्यासाठि,
पुन: पुन: धडपडायचं......
Post a Comment