Wednesday, August 22, 2007

नाही सांगता येणार?

नाही सांगता येणार?

पाणावलेले डोळे म्हण्तात,
नाही विसरू शकत तुला..
पण नशिब म्हण्तं..
विसराव लागणार..

मी घेतलेला प्रत्येक श्वास,
घेतं तुझंच नावं,
पण या ऒठांना ते
नावंच विसराव लागणार..

माहित आहे मला, प्रत्येक क्षणी,
तुझाच चहेरा नजरे समोर असणार आहे..
पण तु समोर आलास की
तीच नजर फिरवावी लागणार..

आज पर्यंत तुझ्याच आठ्वणीं सोबतच जगत आले,
पण आता त्याच आठ्वणीं
पासूनच पळावं लाग णार...

हा विरह कधीच सहन नाही झाला,
पण आता याच विरहा सोबत..
पूर्ण आयुश्य ज गावं लागणारं..

अश्रु आज ही आहेत पापणीं वर साठ्लेले,
का ते नाही सांगता येणार?

Newer Posts Older Posts Home

 

blogspot templates | Webtalks