Thursday, October 23, 2008

शाळा म्हटली की नुसती आठवणींची गर्दी होते

शाळा म्हटली की नुसती आठवणींची गर्दी होते

शाळा म्हटली की
नुसती आठवणींची गर्दी होते
ते धावत जाण
धावता धावता सरांवर आपटण...

आठवत आपण एकदा बेल वाजवलेली
मग प्राचार्यांनी आपल्या कानाखाली काढलेली
नंतर मग कान पकडून "ती" गम्मत सांगीतलेली
ये आठवत एकदा आपण आपल्या
प्राथमिक शाळेच्या बाईना भेटायला गेलेलो
आणि चुकुन मॅम आत येउ का विचारलेल
बाई बोललेल्या मग "परदेश्या लाज वाटते का बाई म्हणायला?"
किती प्रेमाने बोलायच्या नाही
आठवते का ती दहावीची कविता "आई"
मराठीच्या मॅडमने शिकवलेली
डोळे पुसता पुसता आपली वाट लागलेली
ये तुला आठवता का
आपल्या शाळेत स्पोर्टस डे होता
आपण हजेरी लावुन पळालेलो
आणि मग कुठे कुठे हिंडलेलो..
आपला डब्बा संपवून दुसऱ्याचा खायची
सवय तिथलीच ना रे
आठवत ना
मधल्या सुट्टीच्या आधीच्या तासालाच
डब्बा खाण
न् मग उरलेली सुट्टी फ़क्त खेळण
ते घामाने ओल होऊन वर्गात येण
आणि मग कोण जिंकल
ह्यावरुन उरलेला वेळ वाद
घालत बसण
सरांनी पकडल की
वर्गाच्या बाहेर कोंबडी करुन उभ राहण
आठवतो तो कार्यानुभवाचा तास
आणि तो चित्रकलेचा
त्या सरांनी मला नापास केलेलस
म्हणुन तु भडकलेलास
ये ते मंदिर आठवता का रे
शाळेच्या मागच
आपली नेहमी सहल जायची तिथे
तिथे डब्बा खाऊन परत यायचो
आणि मग शाळेसमोरच्या
दुकाणातून पोंगे आणून् खायचो
ये आठवता का ते
मागच्या बेंचवर बसुन
कागदाचे गोळे मारन..
ये तुला ती ही आठवते का..
काय बर तिच नाव रे..
हं नैना ,अरे जोश्यांची रे *****
तु साल्या लाईन मारयचास
तिला आता २ पोर झालियेत
पण अजुन तशीच आहे रे ..फटाकडी
साल्या तु मला नेहमी छुपारूस्तम म्हणायचा
आणि ती माझ्यशी बोलायची म्हणुन् जळायचास
खर सांगू तुला जळवायलाच मग आम्ही बोलायचो
ये आठवत का रे तुला
परिक्षेचा निकाल आला की मग
उगाचच वाद घालायचो आपण १-१ मार्कावरून
आणि शाळा सुटली की मग धावत जायचो
समोरच्या गोळे वाल्याकडे
ते खायच सोडून एक्मेकांवर मारत बसण..
मागून सर आले की मग घराकडे धूम ठोकन
सारच कस स्वप्ना वाटत ....
काल आपण अनुभवलेल
आज दुसरा कोणी..


माहितेय कालच आपल्या मरठीच्या मॅम भेटलेल्या
आपली आठवण काढत होत्या...
कान पिरगाळुन म्हणाल्या
काय रे तो नालयक कुठे आहे म्हणून..
अजुन नाही रे विसरल्यात आपल्याला.......

1 comments:

kavita khupach changali aahe....
ashi ekahi vyakti nahi jila shalechi aathavan yet nahi.......

Post a Comment

Newer Post Older Post Home

 

blogspot templates | Webtalks