प्रेमाची सहल......
प्रेमाची सहल......
किती दिवसांनी हा योग आला..
एकत्र फिरायला जायचा बेत आखला..
खुप आंनद झाला होता तिला..
जेव्हा त्या बेताचा ठराव अखेर मंजूर झाला..
तिची तयारी सुरू झाली..
चल जायचय जायचय म्हणून
अखंड जपवारी सुरू झाली..
मला ही आंनद झाला होता
पण तिच्या त्या हर्षापूढे
तो हि फिका पडला होता..
किती दिवस रहायचे ,
कुठे कुठे हिडांयचे?
असे प्रश्न ती विचारू लागली..
उत्तर सांगताना माझी बोबडीच वळू लागली..
अखेर प्रवास सूरू झाला..
त्या कोकणच्या सौंदर्याकडे..
ती म्हणाली माझ्यकडे बघ
काय आहे त्या तिकडे..
मी हसून म्हणालो..
ते सौंदर्य अप्रतिम आहे
खरोखर निखळ पाण्यातलं..
तुझचं तर एक सुंदर प्रतिबिंब आहे
आमराईच्या सावलीत
माझ्याच मिठीत ती विसावली..
मला जरा बरं वाटल..
प्रश्न उत्तरांची परिक्षा थोडा वेळ का होईना थांबली...
मग आला तो अथांग किनारा सागराचा..
स्पर्श होत होता गुदगुल्या करणारया त्या वाळुचा..
कधी लाटां तरी कधी तिच्या केसांच्या बटांना
दुर करुन प्रयत्न चालूच होता सतत मला कुरवाळण्याचा..
माझी जलपरी मनसोक्त
सागर जलविहाराचा आंनद घेत होती..
तिच्या गोरयापान देहावरून
निथळत होते ते सुवर्ण मोती..
खुप सारी मजा झाली ..
अन मग आता रात्र आली..
खर सांगायच तर आता
माझी वेळ आली..
ती लाजत होती ..
स्पर्शात माझ्या भिजत होती..
मी सुध्दा शुध्द हरपून गेलॊ
काय माझी अवस्था झाली होती..
किती सुखद होता ..
तो क्षण रातमिलनाचा..
गहिवरला होता स्पर्शा आमूचा
अन जुळला होता भाव आमच्या मनाचा..
आता सहल संपत आली
अन तिची तांराबळ उडाली..
झाली एवढी मजा ..
दुसरया दिवशीच्या घरच्या आवरा आवरीने निघाली..
अजुनही तिची अश्या प्रेम सहलीची
हाऊस फिटलीच नाही..
शेवटच शेवटच म्हणून ..
आमच्या सहलींची काही गिनतीच नाही...
Post a Comment