Monday, August 20, 2007

Kahi premal vyakhya - ultimate


PLEASE CLK ON THE PICTURE TO SEE





Saturday, August 18, 2007

नशीबचा खेळ

नशीबचा खेळ

सार काही करविते ते

क्षणात सार बदलविते ते

अपेक्षा नसताना ही देत ते
हातातले हिस का उन नेते ते

म्हणतात याला नशीबचा खेळ
जम त नाही जिथे कशयाचाच ताळमेळ

आपल आपल म्हणणारा पाठीत घाव घालतो
अनोळखी येऊन हळू च मलम् लावतो

भान विसरून सारे ज्याच्या मागे धावतो
मूर्ख म्हणून तोच किमत आपली सांगतो

नाही समजत ती कधी कोणावर आनेल कशी वेळ
म्हणतात याला नशीबचा खेळ

जीवभावाचा क्षणात जिवावर उठतो
जपत आसतो ज्यासाठी तोच ते लुटतो

बरोबर वागूण ही चुकच आपण ठरतो
नाही सुटत सहजासहजी याने विणलेला पीळ

म्हणतात याला नशीबचा खेळ

Friday, August 17, 2007

रोमरोमांत भिनलास तू......

रोमरोमांत भिनलास तू......

रोमरोमांत भिनलास तू,
माझ्यात सामावलास तू,
माझिया मनातल्या कळ्यांचा,
फूलोरा बनलास तू...

आलास जीवनी असा,
जसा वारा सोसाटयाचा,
मला उडावून नेणारे,
वादळ बनलास तू...

तुझिया मिठीत सामावूनी,
तप्त अशी मी जाहले,
माझिया मिठीत धुंदावूनी,
फक्त माझा बनलास तू...

जगतच होते मी तशीही,
दिशाहीन नावेपरी,
येवूनी जीवनात माझ्या,
किनारा बनलास तू..

Newer Posts Older Posts Home

 

blogspot templates | Webtalks