Thursday, August 16, 2007

काही मस्त चारोळ्या

काही मस्त चारोळ्या

1) तुला आपले बनविणे स्वप्न आहे हे सुंदर

मिटवावे लागणार आहे त्यासाठी धरणी आकाश्यतील आंतर

2) फुलासारखे फुलून बघ फुलपाखरू होऊन उडून बघ
नाही सुकल्यावर फुलता येत
म्हणूंच म्हणतो आत्ता च प्रेमात पडून बघ

3) छोट्या छोट्या गोष्टीत पोर बनून शिरता यावे
क्षणभर का होईना भोकाड पसरून राडता यावे

4) प्रत्येकाला आशा असते
आशेवरच जो तो जगत् असतो
हाती काही ही नसले तरी
सुंदर स्वप्न बघत असतो

5) सगळे काही विसरून चाललोय
जग तुझे सोडून
फक्त एकच सांग काय मिळा व ल स
माझ्याशी आस वागूण

Wednesday, August 15, 2007

या सुंदर जीवनात कधी कधी

या सुंदर जीवनात कधी कधी

या सुंदर जीवनात कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्यासाठी कधी कधी..

पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत

विचारात गुंतल्यासारख कधी कधी

अन पाहताना तिच्याकडेच

विचारात गुंतायच असत कधी कधी..

रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच...

जागुन अशी रात्र काढावी कधी कधी

नंतर "जागली होतिस का रात्री?"

म्हणून विचारावे कधी कधी..

मागायचा असतो देवाकडे..

हात तिचा चोरुन कधी कधी

द्यायच असत आश्वासन त्यालाही

पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी..

चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या

विषय तिचा निघाल्यावर कधी कधी

असते रागवायचे लटकेच

"अस काही नाहिये" म्हणून कधी कधी

विरहात तीच्या ...

असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी..

पाहुन हात तिचा दुसर्या हाती ..

असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्यासाठी कधी कधी

Thursday, August 9, 2007

जेव्हा मी तुला प्रथम पाहीले..

जेव्हा मी तुला प्रथम पाहीले..

ओंजळीत शुभ्र फुलांच्या कळ्या
वेचून तु झरझर निघालीस..

पैंजणाच्या तालावर खरोखर
तु मला वेड लावूनी गेलीस..

तलम रेशमी केस तुझे
गालावरून ओठांवर पसरले होते...

तुझ्या मखमली गालांवरून
डोक्यावरच्या पदराचे काठ सरकत होते..

डोळ्यात तुझ्या सुर्याचे प्रतिबिंब
किती सुंदर झळकत होते..

कोरीव भुवयांच्या मधोमध..
तेज दिव्य शक्तिचे तळपत होते..

तुला पाठमोरी होताना पाहूनी..
मना हूरहूर लागली....

Newer Posts Older Posts Home

 

blogspot templates | Webtalks